आई- वडीलांबरोबर गेलेल्या मुलाचा सेल्फीच्या नादात शेवाळावरुन पाय घसरुन पडून मृत्यू

शांताराम काळे
Tuesday, 29 December 2020

आई, वडील, बहीण, भाऊ यांच्याबरोबर भंडारदरा येथे फिरण्यासाठी गेलेल्या १५ वर्षाच्या मुलाचा सेल्फी काढताना तोल जाऊन मृत्यू झाला आहे. ओम पाबळ (वय १५) असं या मुलाचे नाव आहे.

अकोले (अहमदनगर) : आई, वडील, बहीण, भाऊ यांच्याबरोबर भंडारदरा येथे फिरण्यासाठी गेलेल्या १५ वर्षाच्या मुलाचा सेल्फी काढताना तोल जाऊन मृत्यू झाला आहे. ओम पाबळ (वय १५) असं या मुलाचे नाव आहे. 

पाबळ हा मॉर्डन विद्यालयात शिक्षण घेत होता. स्पिलवे जवळ असलेल्या डोहात सेल्फी काढण्याच्या नादात तो पाय घसरून पडला नी त्याला डोहतून बाहेर काढण्यास उशीर झाला. त्यामूळे तो मृत झाल्याची घटना घडली आहे. आपल्या कुटुंबासह भंडारदरा परिसरात फिरण्यासाठी आलेला ओम संजय पाबळे याने जलाशयात बोटिंग केलीनंतर ते त्याच्या मित्राच्या घरी जेवण करून स्पीलवे गेट खाली असलेल्या खडकावर फिरण्यासाठी गेले.

त्याचा सेल्फी घेत असताना शेवळावरून पाय घसरुन तो पाण्यात पडला. त्याच्या नाका तोंडत पाणी जाऊन त्यात त्याचा मृत्यू झाला. जवळच असलेला गुराखी पळत आला दरम्यान त्याचा मृत्यू झाला. राजूर ग्रामीण रुग्णालयात त्याला नेण्यात आले होते. राजूर पोलिसांनी याची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son dies after falling from moss in Akole taluka