Gold Robbery Ahilyanagar : 'सासूच्या दागिन्यांवर जावयाचा डल्ला'; उसने पैसे न मिळाल्याने कृत्य, ४८ तासांत गुन्हा उघडकीस
Son-in-Law Steals Jewellery in Ahilyanagar : सासूबाईंकडून उसने पैसे न मिळाल्याने रागातून हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. चोरी केलेल्या दागिन्यांची रक्कम एक लाख ९४ हजार रुपये इतकी असून, सर्व दागिने हस्तगत करून शेख यांच्या ताब्यात देण्यात आले.
श्रीरामपूर : शहरातील जुन्या घरकुल परिसरात पैसे न दिल्याच्या रागातून जावयानेच सासूच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ४८ तासांत गुन्हा उघडकीस आणत एक लाख ९४ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले.