esakal | सोनई : भिशीच्या पैशांसाठी युवकाचे अपहरण
sakal

बोलून बातमी शोधा

अपहरण प्रकरण

सोनई : भिशीच्या पैशांसाठी युवकाचे अपहरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनई : अंमळनेर (ता. नेवासे) येथे भिशी व व्याजाचे पैसे न मिळाल्याने युवकाचे अपहरण करून त्यास डांबून ठेवण्याची घटना घडली. सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होताच युवकास सोडून आरोपी पसार झाले आहेत.

याबाबत पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की अंमळनेर येथील राजेंद्र द्वारकानाथ पवार यांच्याकडून भिशीचे तीस हजार रुपये येणे होते. या रकमेचे व्याज व दंड व्याज न दिल्याने पवार यांचा मुलगा सौरभ याचे मागील आठवड्यात बुधवारी (ता. ८) दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून, अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते.

या घटनेनंतर पवार यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राजेंद्र भीमराज सुपनर, विलास बबन आयनर, कैलास बबन आयनर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी सौरभ यास सोडून दिले आणि ते पसार झाले.

loading image
go to top