
अहिल्यानगर : समाजात वावरताना आज बऱ्याचदा डोळस माणसे देखील कधी कधी चुकीचे वागताना दिसतात. अशा परिस्थितीत दृष्टीहीन तरुण- तरुणी मात्र सकारात्मक उर्जा तयार करण्याचे काम करतात. या दृष्टीहिन व्यक्तींनी एकत्र येऊन अहिल्यानगर येथे नुकतेच राज्यस्तरीय गीत गायन व काव्य स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात दृष्टीहिनांनी सादर केलेले गीत गायन व कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.