
राज्यात कोरोनाच्या संकटामुळे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होणे चिंताजनक आहे.
संगमनेर (अहमदनगर) : राज्यात कोरोनाच्या संकटामुळे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होणे चिंताजनक आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात काँग्रेसच्यावतीने रक्ताच्या 25 हजार पिशव्या संकलनासाठी रक्तदानाचे महाअभियान राबवीत आहे.
या अंतर्गत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने एक हजार एक रक्तपिशव्यांचे संकलन होणार असल्याची माहिती इंद्रजीत थोरात यांनी दिली. यामधून सुमारे 25000 रक्तदानाचे संकलनाचे उद्दिष्ट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ठेवण्यात आले असून तालुक्यातून 1001 रक्तपिशव्या दान केले जाणार आहे. आज तालुक्यातील राजापूर येथील विठाई मंगल कार्यालयात या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लि करा
या प्रसंगी बाबा ओहोळ म्हणाले, मानवाने विज्ञानाच्या जोरावर सर्व काही साध्य केले परंतु अद्यापही रक्त निर्माण करता आले नाही. सध्याचा राज्यातील रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी तरुणांनी रक्तदान करुन या देश कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. राज्यात निर्माण झालेला रक्त पुरवठा कमी करण्यासाठी, तालुका काँग्रेसच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महारक्तदान अभियानाचा संकल्प केला आसून, तालुक्यातून सुमारे एक हजार एक पिशव्या रक्त संकलित करण्याचा निर्धार केला आहे.
या रक्तदान अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यातून विविध गावांमधून 1001 पिशव्यांचे रक्तदान होणार आहे. यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तळेगाव, राजापूर, जवळे कडलग, साकुर, वडगावपान, संगमनेर शहर, चंदनापूरी, धांदरफळ, निमोण या गावांमधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
या वेळी इंद्रजित थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, रामहरी कातोरे, विष्णुपंत राहटळ, बाबासाहेब गायकर, माधव हासे, आनंद वर्पे आदींसह गावाचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर