
पारनेर : अहिल्यानगरचे नूतन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी घार्गे व हजारे यांच्यात अनौपचारिक गप्पा झाल्या. यावेळी घार्गे यांनी हजारे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. हजारे यांनी आपल्या विविध अंदोलनाचा इतिहास सांगत जलसंधारणाच्या कामांची व राळेगणसिद्धी गावाचा इतिहासही कथन केला.