
सोनई : जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज शनिशिंगणापूरला भेट देऊन ऑनलाइन पूजा घोटाळा विषयी शनैश्वर देवस्थान विश्वस्तांची बाजू ऐकून घेतली. देवस्थानने तक्रारीत उल्लेख केलेल्या तीन ऑनलाइन अॅप आणि ते चालविणा-या मालकांचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावला जाईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.