esakal | गावाला एकच 'वेस' असते असं आपल्याला माहितंय, पण 'या' गावाला आहेत तब्बल तीस 'वेस'!
sakal

बोलून बातमी शोधा

A special story about the history of Teesgaon in Pathardi taluka

पूर्वी गावांच्या वेशीला खूप महत्त्व होतं. गावची दिव्यता वेशीवरुन ठरली जायची. अनेक गावात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असायचा तो म्हणजे वेस.

गावाला एकच 'वेस' असते असं आपल्याला माहितंय, पण 'या' गावाला आहेत तब्बल तीस 'वेस'!

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : पूर्वी गावांच्या वेशीला खूप महत्त्व होतं. गावची दिव्यता वेशीवरुन ठरली जायची. अनेक गावात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असायचा तो म्हणजे वेस. बाजार पेठ असलेल्या ठिकाणी वेशीतून येताना आणि जाताना सारा जमा करण्यासाठी उपयोग होतहोता. पुढे त्याची जागा कमानींनी घेतली.

पूर्वी सारख्या वेशी सध्या गावांमध्ये नाहीत. काही गावांना तर संपूर्ण संरक्षण भिती असत. त्यामुळे गावात प्रवेश करायचा तर वेशीतूनच करावा लागत. आजही काही ठिकाणी बैलपोळ्यादिवशी वेशीला तोरण बांधले जात होते. त्यातून बैलांना आणले जात होते. काही ठिकाणी तर लग्नादिवशी नवरदेवाला वेशीतून आणले जात आणि वेशीत नवरदेवाकडून नारळ फोडला जात होता. पुढे या वेशींची जागा स्टिलच्या कमानींनी घेतली. 

हेही वाचा : एका विहीरीमुळे बदलेले गावाचे नाव; नगर जिल्ह्यातील ‘हे’ गाव म्हणून आहे देशात प्रसिद्ध

गावातून नागरिकांचे स्थलांतर वाढले. त्यामुळे कालंतराने वेशींचे महत्त्व पूर्वीपेक्षा कमी होत गेले. महाराष्ट्रात प्रत्येक गावात अशा वेशी होत्या. नगर जिल्ह्यातील तर एका गावात तब्बल ३० वेशी आहेत. त्यावरुन त्या गावाचे नाव सुद्धा तीसगाव पडल्याचे सांगितले जात आहे. 

अहमदनगर जिल्हा तसा राज्यात विविध कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जिल्ह्यात पाथर्डी, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवासे, पारनेर, राहाता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर व संगमनेर हे तालुके आहेत. यातील प्रत्येक तालुक्याचे वेगळेपण आहे. यातील पाथर्डी तालुक्यात तीसगाव आहे. अहमदनगरपासून ४० तर पाथर्डीपासून २९ किलोमीटरवर हे गाव आहे. पाथर्डी तालुक्यात १३७ गावे आहेत. त्यापैकीच तीसगाव हे एक आहे. या तीसगावमध्ये एैतिहासीक वाडे आहेत. तीसगावला ऐतीहासीक वारसा लाभलेला आहे. येथे मोठी बाजारपेठ आहे.

पत्रकार सुनिल अकोलकर म्हणाले, तीसगावमध्ये ३० वेशी होत्या. मात्र, आता फक्त तीन वेशी राहिल्या आहेत. तर दोन कमानी राहिल्या आहेत. त्याहीवेशीप्रमाणेच आहेत. पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यावर झाडे आली आहेत. त्याला संरक्षण भिंती आहेत. गेल्यावेळी पतंप्रधान मोदी यांच्या एका योजनेतून निधी मिळाला होता. त्यावर झाडे उगवली आहेत. त्यावर गवत आहेत. त्यातील एक वेस कधी पडेल ही सांगता येत नाही. त्याकड लक्ष देण्याची गरज आहे. येथे मोठे वाडे आहेत. वाड्यांसमोरही वेशी होत्या. पूर्वी वाड्यात जाईला सुद्धा वेशीप्रमाणेच कमानी होत्या. गावाला पूर्ण संरक्षण मिळावे म्हणून या वेशी असायच्या. मात्र, कालंतराने त्याकडे दुर्लक्ष होत गेले. येथील वाडा हा ४० ते ५० खनाचे असायचे. त्यात लपून बसायची सुद्धा व्यवस्था होती. त्यात पाण्याचे आढ सुद्धा होते. वेस ही तीसगावची शान आहे. पण या वेशी दुर्लक्षीत झाल्या.

तीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब लवांडे म्हणाले, सरकारच्या दुर्लक्षामुळे वेशींची पडझड झाली आहे. येथे ३० वेशी असल्याचे सांगितले जाते. मात्र, आम्हाला समजत आहे, तेव्हापासून तर ऐवढ्या वेशी दिसत नाहीत. आता हाताच्या बोटावर मोजण्याऐवढ्या वेशी राहिल्या आहेत. याकडे दुर्लक्ष झाले तर याही वेशी राहणार नाहीत. त्यामुळे या वेशींकडे सरकारने लक्ष देऊन ऐतिहासीक वारसा जतन करावा. ग्रामपंचायत यामध्ये खर्च करण्यासाठी तयार आहे. मात्र, कायद्याच्या तरतुदीमुळे खर्च करता येत नाही. पूर्वी गाव छोटे होते, मात्र आता गावाचा विस्तार झाला.

पाच वेशींना सरंक्षण भिती
भारतीय पुरातत्व विभागाचे नगर उपमंडल संरक्षण एम. पी. पवार म्हणाले, तीसगावात ३० वेशी होत्या. आता तेवढ्या राहिल्या नाहीत. पाच वेशी चांगल्या आहेत. या पाच वेशींचे संरक्षण व्हावे म्हणून संरक्षक भिंती बांधल्या आहेत. या पाच वेशी महाराष्ट्र पुरात्त्व विभााकडे येतात. आजंठा, वेरुळ, कु्तुबमीणार यांच्या यादीमध्ये या वेशींचा सामावेश होतो.

पैठणाला जोडणाऱ्या रस्त्यावर हे गाव असल्यामुळे त्याला पूर्वीपासून महत्त्व होते. वेशीवरुन गावाची दिव्यता, श्रीमंती समजली जायची. तीसगाव हे बाजार पेठेचे ठिकाण होते. येथील वेशीवरुन शहराचे महात्त्व लक्षात येते. अजूनही राज्यस्थान, दिल्ली, येथील अनेक गावांमध्ये वेशी आहे. गावच्या संरक्षणाच्या दृष्टीने वेशी महत्त्वाच्या होत्या. याबरोबर सारा गोळा करण्यासाठी वेशी महत्त्वाच्या ठरत होत्या.

loading image