One Dies, One Injured After Container Collision in Chas Ghat
Sakal
अहिल्यानगर
Ahilyanagar Accident: भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक; भीषण अपघातात १ ठार, १ जखमी; चास घाटातील घटना, काय घडलं!
Heavy vehicle accident in ghat section: चास घाटातील भीषण अपघात: भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक, एक ठार, एक जखमी
नगर तालुका: पुण्याहून नगरच्या दिशेने लोखंडी प्लेटा घेऊन भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे चास घाटात नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कंटेनर दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजूने जात असलेली दोन मालवाहतूक वाहने व एका कारला धडकला. तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. एका मालवाहू वाहनातील एक जण मृत्युमुखी पडला, तर एक जण गंभीर जखमी झाला. १६ जानेवारीला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

