श्रीरामपुरात स्वयंस्फुर्तीने लकडाउन; ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’चा शुभारंभ

गौरव साळुंके
Wednesday, 16 September 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेचा येथील काळाराम मंदिर परिसरात नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेचा येथील काळाराम मंदिर परिसरात नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. सचिन पर्हे, डॉ. संकेत मुंदडा, निलेश बाबरिया, शिवाजी सोनवणे, डॉ. उमेश लोंढे, संजय पवार, निखील पवार उपस्थित होते.

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असुन कोरोनाचा साखळी तोडण्यासाठी शहरात विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. सचिन पर्हे यांनी दिली. आरोग्य केंद्राच्या आशा सेविका शहरातील प्रत्येक घरी जावून घरातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करणार आहे. ताप, ऑक्सिजन, फ्यु सदृश आजाराची तपासणी होईल. तसेच इतर आजाराची नोंद घेतली जाणार आहे. कोरोनाची लक्षणे असल्यास तातडीने तपासणीसाठी पुढे येवुन माहिती द्यावी. संसर्ग रोखण्यासाठी जागृती केली जाणार असल्याचे डाॅ. पऱहे यांनी सांगितले. 

माझे कुटुंब, माझी जबाबदारी आरोग्य मोहीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राबविली जात आहे. त्यासाठी शहरातील नागरीकांनी त्यास प्रतिसाद द्यावा. आरोग्य विभाग आपल्यासाठी लढत असुन नागरिकांनी त्यांना साथ देत कोविड मुक्तीसाठी सहकार्य करावे. संसर्ग झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय योजनाचे पालन करण्याचे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले. नगरसेवक रवी पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडधे यांनी मनोगत व्यक्त केले. तर डॉ. संकेत मुंदडा यांनी आभार मानले.

स्वयंस्फुर्तीने लाॅकडाउनचे पालन
रविवारपासुन घोषीत केलेल्या लॉकडाउनचे शहरात स्वयंस्फुर्तीने पालन करण्यात आले. मुख्य बाजारपेठेसह मेन रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड, शिवाजी रोड, गिरमे चौक, नार्दन ब्रॅन्चसह विविध भागातील अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प असल्याचे दिसुन आले. मुख्य बाजारपेठ बंद असली तरी शहरातील रस्त्यावर नागरीकांची वर्दळ कायम होती. तसेच शहरातील प्रभाग दोनसह रेल्वे पटरीच्या गोंधवणी बाजुच्या परिसरातील अनेक ठिकाणची दुकाने उघडल्याचे दिसले.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळल्याने नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी सर्वांचे आभार मानते. लाॅकडाउनमुळे वाढता संसर्ग रोखण्यात मदत होईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्वांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष अदिक यांनी केले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spontaneous lockdown in Shrirampur