पारनेर - सुपे येथील म्हसणे फाटा येथे नव्याने विकसित होत असलेल्या एमआयडीसी फेज टूमध्ये आता थेट श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन हे सुमारे एक हजार ६३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून सिलोन बेव्हेरेजेस हा उद्योगसमूह उभारणार आहेत..या उद्योगासाठी मुरलीधरन यांनी आपल्या उद्योगसमूहासाठी एक लाख ४० स्क्वेअर मीटर जागेची मागणी केली आहे. हा उद्योग उभा राहिल्यानंतर येथे सुमारे साडेचारशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.सुपे येथील म्हसणे फाटा येथे नव्याने जापनीज हब सुरू झाला आहे. या नव्या एमआयडीसीत मोठ्या प्रमाणावर परकीय कंपन्या गुंतवणूक करत आहेत. आता थेट श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज मुरलीधरन यालाही या एमआयडीसीचे आकर्षण वाटल्याने त्यानेही आपल्या सिलोन बेव्हरेजेस साठी ३५ एकर जागेची मागणी केली आहे..नुकतीच मुरलीधरन यांच्या उद्योगसमूहासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या किरकोळ सुधारणा समितीच्या बैठकीत भूखंड वितरित करण्याबाबत चर्चाही झाली. या बाबतचा अहवाल उद्योगमंत्रालयाला मिळताच त्यांना भूखंड वितरणाची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.ही कंपनी सॉफ्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक व मिनरल वॉटरचे कॅन बनविणार आहे. तसेच ते भरून देण्याचे काम या कंपनीकडून केले जाणार आहे. कंपनीला भूखंड मिळण्यासाठी लवकरत औद्योगिक विकास महामंडळाकडून या उद्योगसमूहास पहिल्या टप्यात २५ टक्के रक्कम भरण्याची मागणी करण्यात येणार आहे..त्यानंतर उर्वरित रक्कम त्यांना भरावी लागणार आहे. त्यानंतर या उद्योगाला भूखंड वितरित केला जाणार आहे. या उद्योगसमूहाने १ लाख ४० हजार स्क्वेअर मीटर जागेची मागणी केली आहे. त्यांना जागा ताब्यात मिळाल्यानंतर हा उद्योगसमूह आगामी चार ते पाच महिन्यांत बांधकामास सुरूवात करेल, अशी अपेक्षा आहे.म्हसणे फाटा या एमआयडीसीत सर्वांत प्रथम २०१८ ला चीनच्या कॅरियर मायडिया कंपनीचे आगमन झाले होते. त्यानंतर आतापर्यंत सुमारे ३० हून अधिक विविध प्रकारचे उद्योग सुरू झाले आहेत, तर काही उद्योगांची उभारणी सुरू आहे. आतापर्यंत या एमआयडीसीत सुमारे पाच हजार १८६ कोटींची गंतवणूक झाली असून, सुमारे ११ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे..म्हसणे फाटा एमआयडीसीत आतापर्यंत आलेल्या उद्योगात सर्वाधिक गुंतवणूक करणारा हा सिलोन बेव्हरेजेस हा उद्योग असून, या उद्योगात सुमारे एक हजार ६३५ कोटींची गुंतवणूक होणार आहे. यापूर्वी कॅरियर मायडिया या उद्योगाने सुमारे आठशे कोटींची गुंतवणूक केलेली होती.- डी. आर. काकडे, उपप्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.