
श्रीरामपूर : शहरात एका तरुणावर मंगळावारी (ता.२१) भरदुपारी धारदार शस्त्राने वार करून गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणी गोरख जेधेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेत्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक आहे.