esakal | प्रवाशांना नाशिकमार्गे मुंबईला जाण्यासाठी संगमनेरमधून साधी बस पूर्ववत सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

ST bus start from Sangamner to Mumbai via Nashik for passengers

संगमनेरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिकमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईची असलेली संगमनेर ते मुंबई सेंट्रल ही साधी बससेवा आजपासून पूर्ववत सुरु.

प्रवाशांना नाशिकमार्गे मुंबईला जाण्यासाठी संगमनेरमधून साधी बस पूर्ववत सुरु

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिकमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईची असलेली संगमनेर ते मुंबई सेंट्रल ही साधी बससेवा आजपासून पूर्ववत सुरु करण्यास नगरच्या विभागीय कार्यालयाने परवानगी दिल्याची माहिती संगमनेर आगार व्य्वस्थापक बाबासाहेब शिंदे यांनी दिली.

संगमनेर या मध्यवर्ती ठिकाणापासून मुंबईकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील हंगेवाडी, शिबलापूर, शेडगाव, मालुंजे, पानोडी, पिंप्रीलौकी अजमपूर, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रूक, प्रतापपूर, खळी आदी गावातील लोक नोकरी व कामधंद्याच्या निमित्ताने मुंबई, कल्याण, वाशी, ठाणे आदी ठिकाणी कायम प्रवास करतात. त्यांच्या सोईची असलेली बससेवा कोवीड प्रादुर्भावाच्या काळात गेल्या आठ महिन्यांपासून खंडीत झाली होती. त्यामुळे मिळेल त्या खासगी वाहनातून अवाजवी भाडे देवून, जोखमीचा प्रवास करावा लागत असल्याने, या भागातील जनतेची मागणी सकाळने सर्वप्रथम मांडली होती.

संगमनेर आगाराची नाशिकमार्गे मुंबईला जाणारी बस सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सुटणार आहे. 252.8 किलोमिटरचे अंतर कापून ही बस दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईला पोचणार आहे. सायंकाळी सव्वासात वाजता मुंबईहून सुटणारा बस संगमनेरला पहाटे अडीच वाजता येणार आहे. या लांब पल्ल्यासाठी स्वच्छ व सुस्थितीतील बस उपलब्ध करुन देण्याच्या सुचना आगाराला देण्यात आल्या आहेत. असंख्य प्रवाशांची मागणी आजपासून पूर्ण होत असल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top