esakal | डिझेल नसल्याने एसटी बंद; अकोले तालुक्यातील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

ST service off in Akole taluka due to lack of diesel

अकोले तालुक्यातील खेडेगावात जाणाऱ्या अनेक एसटी बस अचानकपणे बंद झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डिझेल नसल्याने एसटी बंद; अकोले तालुक्यातील प्रकार

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील खेडेगावात जाणाऱ्या अनेक एसटी बस अचानकपणे बंद झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अकोले हे मध्यवर्ती तालुक्याचे ठिकाण असल्याने सिन्नर, पुणे, नाशिक, अहमदनगर येथुन लोक कामानिमित्त येत जात असतात. तर अकोलेपासुन दुर अंतरावर अनेक खेडीपाडी आहेत.

वैद्यकीय, शिक्षण, नोकरी या निमित्ताने अनेक लोक ये जा करत असतात. माञ अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेक लोक कायमच्या प्रमाणे उशीरा काम आवरुन आले. अचानक एसटीला डिझेल नसल्याकारणाने बंद आहेत.

हे कळल्यानंतर त्यांना काय करावे हे सुचेना, यात अनेक लहान मुले, महिला यांना लांब खेडे गावाला जायचे असल्याने व घरी असलेल्या मंडळीकडे मोबाईल व वाहनाची व्यवस्था नसल्याने मोठी अडचण झाली होती. माञ या प्रकाराकडे कोणी ही गांभीर्याने पाहिले नाही.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्थानिक शहरातील राजकिय पदाधिकारी यांनी या गोष्टीकडे किमान लक्ष देऊन खेडेगावात लांबवर जाणाऱ्या अनेक महिलांना थंडीच्या दिवसात लहानमुलांसह आपला निवारा देणे आवश्यक होते. माञ मोठमोठया होर्डींग वर झळकणार्या या युवानेत्यांना, जेष्ठ लोकांना फक्त मतदानापुरतीच गरज दिसुन येते. राञी राजुरला जाणारे अनेक युवक हे थंडीत कुडकुडत बसलेले दिसले अखेर काही समाजसेवी कार्यकर्ते यांनी रस्त्यावर थांबुन एका खाजगी वाहनाव्दारे या युवकांना राजुरला पाठवुन दिले.

यात अनेक महिला वर्गाची मोठी कुचंबना होताना दिसत आहे.एकतर थंडीचे दिवस असुन लहान मुले यांचे प्रचंड हाल होत आहेत या प्रकारा कडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन डिझेल उपल्बध करुन प्रवाश्यांची सोय करुन द्यावी अन्यथा विकासाच्या गप्पा या गप्पा राहतील सामान्य माणसाच्या पायाभुत व गरजेच्या गोष्टी होणे गरजेचे आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image