श्रीरामपूरमध्ये माझी वसुंधरा अभियानास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 February 2021

गावातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे अभियान राबविले. ज्या गावांची लोकसंख्या अधिक आहे, प्रदूषणाची शक्‍यता जास्त आहे

श्रीरामपूर ः राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनासाठी "माझी वसुंधरा' अभियान राबविले जात आहे. तालुक्‍यातील बेलापूर येथे त्याला नुकताच उत्साहात प्रारंभ झाला. 
अभियानात तालुक्‍यातील निपाणी वडगाव व बेलापूरचा समावेश आहे.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश अशा पंचतत्त्वांच्या आधारे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनासाठी ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. उपमुख्याध्यापक विजया दहिवाळ यांनी शपथवाचन केले. उपसरपंच अभिषेक खंडागळे, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, रमेश अमोलिक, ग्रामसेवक राजेश तगरे उपस्थित होते.

गावातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे अभियान राबविले. ज्या गावांची लोकसंख्या अधिक आहे, प्रदूषणाची शक्‍यता जास्त आहे, अशा गावांची निवड अभियानात केली आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश अशा पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, प्लॅस्टिक, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, देशी वृक्षारोपणासह हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. शरद नवले व सरपंच महेंद्र साळवी यांनी मार्गदर्शन केले. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start my Vasundhara Abhiyan in Shrirampur