esakal | अवतरला पांडुरंग भटक्यांच्या घरी, राज्याचे वित्त सचिव आले दारी
sakal

बोलून बातमी शोधा

राजगोपाल देवरा यांनी दिली मदत

अवतरला पांडुरंग भटक्यांच्या घरी, राज्याचे वित्त सचिव आले दारी

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : तालुक्यातील काष्टी हे आर्थिकदृष्ट्या सक्षम गाव आहे. तेथील गायरान जमिनीत भिल्ल समाजाच्या वर्षांनुवर्षे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांना कुठल्याही मुलभूत सुविधा नाहीत. या लोकांपर्यंत राज्याचे वित्त सचिव राजगोपाल देवरा पोचले. त्यांनी त्या लोकांशी थेट व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे संवाद साधत समस्या जाणवून घेतल्या. कोरोनात त्यांना मदतीचा हात दिला.(State Finance Secretary Rajagopal Deora helps the Bhil community)

हेही वाचा: लतादीदी नगरच्या डॉक्टरला म्हणाल्या, सदा सुखी रहा...

लॉकडाउनच्या मदत मिळाल्याने भटक्या समाजातील लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुटले. गेल्या वर्षीही देवरा यांनी अशीच काही भागात मदत पोच केली होती. महामानव बाबा आमटे संस्थेचे अनंत झेंडे यांच्याशी संपर्क साधत देवरा यांनी दोनशे लोकांपर्यंत काही शिधा पोच करायचा आहे. गरजूंना शोधा असा निरोप दिला. झेंडे यांनी काही ठिकाणी माहिती घेतली त्याचवेळी मेळघाटमध्ये काम करणाऱ्या मात्र काष्टीतील रहिवासी असणाऱ्या प्रा. किशोर सोनवणे यांनी काष्टी येथील गायरान जमिनीत राहणाऱ्या भिल्ल समाजाची व्यथा मांडली. यादी जमा करीत, किराणा साहित्य सोबत घेत काष्टीतील ती भिल्ल समाजाची वस्ती गाठली. झेंडे, सोनवणे यांच्यासह अमोल लगड, विकास पाटील यांनी तेथील लोकांशी चर्चा सुरु केली. त्यावेळी त्यांच्या व्यथा समोर आल्या.

देवरा यांच्याशी झेंडे यांनी संपर्क साधला व तेथील अडचणी सांगितल्या. त्यावेळी देवरा यांनी त्या लोकांशी व्हिडिओ काँन्फरन्सद्वारे बोलण्याचे ठरवले. लोक देवरा यांना सांगत होते. साहेब, रात्रीचा पाऊस येतो. त्यावेळी छप्पर तर गळतेच, चमकणारी वीज थेट मुलांच्या डोळ्यात दिसते. आमची तिसरी पिढी याच ठिकाणी राहते. मात्र, वीज, पिण्याचे स्वच्छ पाणी, रस्ते, मुलांचे शिक्षण याची काही सुविधा नाही. हे सगळे सांगत असताना त्या महिला डोळ्याच्या कडा साडीच्या पदराने पुसत असल्याने देवरा हेही अस्वस्थ झाले होते.

उज्ज्वला गॅस मिळाला का, आरोग्याच्या सुविधा आहेत का, या देवरा यांच्या प्रश्नावर तेथील महिला सांगत होत्या. चूल आहे. आमच्यासाठी आता तुम्ही किराणा सामान दिले. त्यामुळे त्या पेटतील. सध्या काम नाही. त्यामुळे रोजंदारीही नाही. राहायला घरकुल मिळत नाही, जातीचा दाखला आणि हक्काची जागा अशी अट असल्याने ग्रामपंचायतही काही करु शकत नाही. त्यामुळे आमचा संसार असा उघड्यावर आहे.

शाळा सुरू करा

देवरा यांनी या लोकांच्या समस्या ऐकूण घेतल्यावर शासकीय पातळीवरच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करूच, शिवाय एक मास्टर प्लॅन बनवून लोकांना निवारा, मुलांना शिक्षण, रोजंदारी याची व्यवस्था करू, असे आश्वासन दिले. महामानव बाबा आमटे संस्थेच्या माध्यमातून तेथे मुलांच्या शिक्षण सुरू करा असे सांगितले.

(State Finance Secretary Rajagopal Deora helps the Bhil community)