
अहिल्यानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अहिल्यानगर शहरात भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. २७ जुलैला सायंकाळी ५ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते उपस्थित रहाणार आहेत. यानिमित्ताने शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी आज दिली.