esakal | कोरोनामुळे शाळेला आली अवकळा; सोनईतील स्थिती, मैदानाला गटाराचे स्वरुप
sakal

बोलून बातमी शोधा

Stink in school premises in Sonai

सोनई येथील जिल्हा परिषद शाळा कोरोना संसर्गामुळे सात महिन्यापासून बंद असल्याने शाळा व शाळेच्या परिसराला अवकळा आली आहे.

कोरोनामुळे शाळेला आली अवकळा; सोनईतील स्थिती, मैदानाला गटाराचे स्वरुप

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : सोनई येथील जिल्हा परिषद शाळा कोरोना संसर्गामुळे सात महिन्यापासून बंद असल्याने शाळा व शाळेच्या परिसराला अवकळा आली आहे. कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात शासन व शिक्षण विभागाने सात महिन्यापुर्वी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयानंतर एकही विद्यार्थी शाळेकडे फिरकला नाही.विद्यार्थ्यांसाठी हा आदेश निघाला असला तरी या सात महिन्यात मुख्याध्यापक अथवा एकही शिक्षक फिरकला नाही हे विशेष.

हेही वाचा : नगरच्या आरोग्य सेवकाबद्दल मुख्यमंत्र्याकडून गौरोद्‌गार
सोनई येथील महादेव मंदीर परीसरात जिल्हा परिषद शाळा, मुलींची शाळा व अंगणवाडी भरते. आज या भागाला भेट दिली असता, खेळण्याच्या मैदानास गटारीचे स्वरुप येवून दुर्गंधी पसरली आहे. सर्वत्र कचरा साचला. गवत आणि काटेरी झाडे वाढली आहेत. स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. गावातील अन्य जिल्हा परिषद शाळेतही अशीच अवस्था पाहण्यास मिळाली.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग सभापती प्रताप शेळके यांनी आज शनिवारी सर्व शिक्षकांनी शाळेत हजर होवून शाळा व मैदान स्वच्छतेबाबत आदेश दिला. मात्र आज दुपारपर्यंत महादेव मंदीर शाळेकडे कुणीच फिरकले नाही. मुख्याध्यापक विष्णु गवसने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे काम सोमवारी(ता.१२) पासून हाती घेवू असे सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top