मुळा धरणावरील "या' प्रकल्पाला "निसर्ग'चा तडाखा 

Storm damage to the Cage project in Rahuri
Storm damage to the Cage project in Rahuri

राहुरी : मुळा धरणातील मत्स्योद्योगाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. मत्स्यसंवर्धनाच्या केजच्या (पिंजरे) जाळ्या तुटल्या. त्यांतील मासे धरणाच्या पाण्यात फेकले गेले. प्रत्येक केज प्रकल्पात मत्स्यबीज, मत्स्यखाद्य, तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 20 ते 22 लाख रुपये खर्च झाला. त्यांचे 12 ते 15 लाखांचे नुकसान झाले. धरणातील 105पैकी 70 ते 75 प्रकल्पांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यामुळे केजचे लाभार्थी हवालदिल झाले आहेत. शासनाने पंचनामे करून मदत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

मुळा धरणाच्या गोड्या पाण्यात बंदिस्त मत्स्यपालन व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे. तरुण उद्योजकांनी राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कर्ज घेऊन धरणाच्या पाण्यात केज प्रकल्प उभारले. मात्र, त्यास निसर्ग चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. धरणातील पाण्यावर प्रचंड लाटा उसळल्या. केजवर आदळून जाळ्या तुटल्या. केजमधील 60 ते 70 टक्के मोठे मासे धरणात फेकले गेले. तुटलेल्या जाळ्या धरणाच्या तळाशी गेल्या. 

अशी असते केज प्रकल्पाची रचना 

केजचा 24 पिंजऱ्यांचा एक प्रकल्प असतो. पैकी चार नर्सरी पिंजऱ्यांत एक लाख मत्स्यबीज सोडले जाते. त्यात, लहान मासे तयार होतात. त्यातून, अडीच ते तीन हजार लहान मासे उर्वरित 20 पिंजऱ्यांत सोडले जातात. 7 ते 12 महिन्यांचे एक किलोचे मोठे मासे विक्रीसाठी पाठविले जातात. मुळा धरणात चिलापिया, पंगस (चोपडा), सायप्रिनस (कोंबडा) प्रकारचे मत्स्यपालन होते. 

मत्स्यपालनावर होणारा खर्च 

केज प्रकल्पात शेकडो कर्मचारी दिवसरात्र काम करतात. त्यांच्या वेतनासह मत्स्यबीज, मत्स्यखाद्य, मत्स्यविक्री व्यवस्थापन, बॅंकांच्या कर्जाचे व्याज, असा मोठा खर्च असतो. 

व्यावसायिकांच्या मागण्या 

मुळा धरणातील केज प्रकल्प नवीन असल्याने, कोणीही विमा उतरविलेला नाही. शासनाकडे प्रकल्पांचे अनुदान प्रलंबित आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, तसेच प्रलंबित अनुदान मिळावे. भविष्यात केजच्या स्ट्रक्‍चरसह त्यातील जिवंत माशांना विमासंरक्षण मिळावे. 

300 जाळ्या धरणात तळाशी 
आमच्या ग्रुपच्या 53 केज प्रकल्पांचे 70 टक्के नुकसान झाले. प्रत्येक प्रकल्पात 40 ते 50 टन मासे विक्रीसाठी तयार होते. वादळामुळे पाणी केजवर आदळून जाळ्या तुटल्या. त्यामुळे धरणात मासे फेकले गेले. प्रत्येक प्रकल्पाचे 12 ते 15 लाखांचे नुकसान झाले. एक जाळी 22 हजारांची असून, अशा 300 जाळ्या धरणात तळाशी गेल्या. 
- शरद बाचकर, केज प्रकल्प लाभार्थी, मुळा धरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com