
संगमनेर : संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यांनी हाहाकार माजवला असून वनकुटे (ता. संगमनेर) येथील पाबळपठार भागात वादळाने अक्षरशः थैमान घातले. जोरदार वाऱ्यामुळे १२ आदिवासी कुटुंबांची घरांचे मोठे नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्यही पूर्णतः नष्ट झाले आहे. या घटनेत एकूण १० लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे.