Ahilyanagar Storm: अहिल्यानगरात वादळी पावसाचा तडाखा; झाडे उन्मळली, वीजपुरवठा खंडित, पाणीपुरवठा विस्कळीत

Heavy rain and strong winds uproot trees in Ahilyanagar: वादळी पावसाने सावेडीसह शहरातील २५-३० झाडे कोसळली; विजेच्या तारा, पोल नुकसानग्रस्त, वाहतूक ठप्प; मनपाचे पथक रात्रभर मलबा हटवण्यात गुंतले
Ahilyanagar Hit by Strong Winds and Rain; Water and Electricity Services Affected

Ahilyanagar Hit by Strong Winds and Rain; Water and Electricity Services Affected

sakal

Updated on

अहिल्यानगर: शहरात रविवारी (ता. ३१) रात्री वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसात विविध ठिकाणी २५ ते ३० लहान-मोठी वृक्ष उन्मळून पडली. एका घराची भिंत कोसळून नुकसान झाले. काही ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या, तर काही ठिकाणी महावितरणचे पोल वाकले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण झाले. शहरातील वीजपुरवठा देखील मध्यरात्रीपर्यंत खंडित झाला होता. दरम्यान, पाणी योजनेवरील वीजपुरवठा खंडित झाल्याने शहर आणि उपनगरांचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com