
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अचानक एखादा आजारापणाचा प्रसंग कर्तव्यावर असताना दुर्दैवाने आला तर सर्वात सदैव मदतीला डॉ. अमोल शिंदे धावत असतात.
अहमदनगर : जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अचानक एखादा आजारापणाचा प्रसंग कर्तव्यावर असताना दुर्दैवाने आला तर सर्वात सदैव मदतीला डॉ. अमोल शिंदे धावत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यातील देव माणूस म्हणूनच त्यांच्याकडे आता जिल्हा परिषदेचे कर्मचारी पाहू लागलेले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून डॉ. अमोल शिंदे जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. सदैव कामात तत्पर असलेल्या डॉ. शिंदे यांनी आपली कर्मचाऱ्यांच्या नेहमीच सुख- दुः खात धाव घेत असतात. त्यांच्या या उपक्रमाने सर्वांच्याच परिचित झाले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात त्यांनी यशस्वीपणे आपले कर्तव्य बजावलेले आहेत. या काळात जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. हे सर्व काम त्यांनी जिल्हा परिषदेचे आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या नेतृत्वाखाली केलेले आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेतील एका राष्ट्रीय आरोग्य अभियानातील निलंबित कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेत चक्कर येऊन पडल्याची घटना जिल्हा परिषदेत घडली होती. त्यावेळी डॉ. शिंदे यांनी धावपळ करत संबंधित कर्मचाऱ्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
त्यानंतर मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील नीलेश चौधरी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अभ्यंगत कक्षात बसलेल्या एका कर्मचाऱ्याला असाच अचानक त्रास झाला. याची माहिती मिळताच डॉ. शिंदे यांनी धाव घेत संबंधित कर्मचाऱ्याची तपासणी करत जिल्हा रुग्णालयात हलविण्याची प्रक्रियाही शिंदे यांनी केली.
सोमवारी (ता. १) शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याला अचानक चक्कर आली. याची माहिती डॉ. शिंदे यांना समजताच त्यांनी कर्मचाऱ्याची तपासणी करून स्वतःच्या वाहनातून नेऊन संबंधिताला खासगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. सदैव कर्मचाऱ्यांना अचानक उदभवणाऱ्या प्रसंगाच्या वेळी मदतीला धावणारा अधिकारी म्हणूनच आता त्यांची ओळख निर्माण झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरु झालेली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर