रंगाची उधळण करत कलाविष्कारासाठी राहुल लोहकरे यांची काचेवरची कसरत

विनायक दरंदले
Sunday, 27 December 2020

सोनई येथील राहुल लोहकरे यांनी आपल्या १८ वर्षाच्या व्यवसायात श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची एकशे सोळावी काचप्रतिमा तयार केली आहे.

सोनई (अहमदनगर) : सध्याचं युग अतिशय गतीमान असले तरी कलेचा अविष्कार घेवूनच जन्माला आलेला सोनई येथील राहुल लोहकरे यांनी आपल्या १८ वर्षाच्या व्यवसायात श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची एकशे सोळावी काचप्रतिमा तयार केली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याची काचेवरची कसरत कलाकारीचा जिंवत झराच आहे.

सोनईत मामाच्या घरी राहत असलेला राहुल बालपणी मातीच्या चिखलातून विविध मुर्ती साकारत होता.कलेचं बाळकडू लाभलेला हा कलाकार अतिशय अवघड अशा काचप्रतिमा तयार करु लागला.

२००२ मध्ये त्याने रंगीत काचेचे तुकडे वापरुन व्यकंटरमण बालाजीची प्रतिमा तयार केली होती.हा कलेचा अविष्कार पाहुण त्यास अनेक देवदेवतांच्या प्रतिमेचे काम मिळाले. त्याने आतापर्यंत गणेश, शनि महाराज, तुळजाभवानी, विठ्ठल- रुख्मिणी, साईबाबासह शिवराज्याभिषेकच्या काचप्रतिमा तयार केल्या आहेत.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोनईतील हा कलाकार सध्या विठ्ठलवाडी,सिंहगड रस्ता, पुणे येथे १५ बाय २० च्या पत्र्याच्या खोलीत ही कला जोपसताना काचेवरची कसरत करत आहे. आई आशा शाम लोहकरेची साथ त्याला लाभली आहे. विविध रंगीत आणि पोत (टेक्सश्चर्स) असलेल्या विदेशी काचेचे तुकडे वापरुन तो देवतांची प्रतिमा तयार करतो. त्याने ही कला अठरा वर्षापासून जोपासली आहे. सध्या तो श्रीपाद श्रीवल्लभ प्रतिमेचे काम करत आहे. 

पिठापुर येथे दर्शनासाठी जाऊन तेथे पारायण केले.काही दिवसातच श्रीपाद श्रीवल्लभ प्रतिमेचे काम मिळाले.महाराजांना ११६ अंक प्रिय आहे आणि मी ११६ प्रतिमा त्यांचीच करत असल्याने मनोमन आनंद होत आहे.
- राहुल लोहकरे, काच कलाकार 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of the painting by Rahul Lohkare from Sonai