esakal | कोणापुढेही हात न पसरता ‘त्या’ दोघीही विधवा मायलेकी डोंगरावर राहुन हाकतायेत संसाराचा गाडा
sakal

बोलून बातमी शोधा

Story of Tulsabai Mengal and Rakhmabai Pathve in Pimpalgaon Nakvinda

निळवंडे जलशय परिसरातील पिंपळगाव नाकविंद शिवारात गावकुसाबाहेर डोंगरावर तुळसाबाई मेंगाळ व रखमाबाई पथवे या दोन विधवा मायलेकी चिल्या पिल्याना घेऊन  गवताच्या झोपडीत जीवन जगत आहेत.

कोणापुढेही हात न पसरता ‘त्या’ दोघीही विधवा मायलेकी डोंगरावर राहुन हाकतायेत संसाराचा गाडा

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : निळवंडे जलशय परिसरातील पिंपळगाव नाकविंद शिवारात गावकुसाबाहेर डोंगरावर तुळसाबाई मेंगाळ व रखमाबाई पथवे या दोन विधवा मायलेकी चिल्या पिल्याना घेऊन  गवताच्या झोपडीत जीवन जगत आहेत. ना घर... ना कोणती सुविधा... पण कोणतीही तक्रार न करता प्रपंचाचा गाडा हाकत आहेत. 

अनेक वर्षे या जंगलात आपली अर्धवट संसाराची गाडगी- मडकी घेऊन प्रवास करीत आहेत. ऊन- वारा- पाऊस याचा सामना करत दोन- चार शेळ्या सांभाळून शेताच्या एका तुकड्यावर या दोन महिला एकमेकीला साथ करत आहेत. गवताच्या झोपडीत त्या राहत आहेत. मात्र सर्वांना घर देणारे सकार अद्याप त्यांच्या दारी पोचले नाही. 

गावात ग्रामपंचायत आहे. पण गवकुसाच्या बाहेर राहणाऱ्या महिलांना घरकुलाचा लाभ अजून मिळाला नाही. घरी त्या झऱ्याचे पाणी आणतात. पावसाळ्यात लवाचे पाणी गोळा करून आपली तहान भागवतात. उज्वला त्यांच्या घरी पोहचलीच नाही. मग लाकूडफाटा तोडून त्यातच आपल्या चुली पेटवून दिवस कंठीत या माय- लेकी महिला येणाऱ्या दिवसाला धीराने सामोरे जाऊन संघर्ष करत आहेत. 

रखमाबाई वृध्द झाल्या आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी येतात. तर तुळसाबाई मेंगाळ यांना सोमा, रामा दोन मुले आहेत. संसारात पती अर्ध्यावर सोडून गेले. मग गावकुसाबाहेर तुळसाबाई आपले झोपडी आपली आई रखमाबाई शेजारी बांधली. डोंगरावर रस्त्याच्या कडेला या दोघी राहतात. गवताची झोपडी पावसाळा सुरू झाल्याने एक शेळी विकून त्याचा प्लास्टिक कागद आणून तो छतावर टाकला. 
पाणी घरात येऊ नये म्हणून या आदिवासी ठाकर समाजाच्या स्वतः ला आधार नसला तरी आपल्या बाळा ना सांभाळत जीवन कंठीत आहेत. मात्र अजून एकही सरकारी अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहचला नाही की साधी विचारपूस केली नाही.

सरकारी योजना येतात जातात पुढाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लोक त्या योजनाचा डबल- टिबल फायदा घेतात. मात्र रंजल्या गांजल्या, निराधारांना आधार देण्यासाठी पुढे कुणी सरसावत नाही. त्यामुळे वर्षनुवर्षे दुर्लक्षित समाज आजही तेच जीवन जगत आहे. उद्याची पहाट कशी उगवेल माहीत नाही. मात्र आलेल्या संकटाशी संघर्ष करत आजचा दिवस जगताना उद्याची पहाट खरचं आपल्या जीवनात बदल करेल. का याचा विचार न करता या झोपडीत माझ्या ये तं तरी सुखे या जाता तरी सूखे जा म्हणत जीवन कंठीत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर