गोष्ट लॉकडाउनमधील एका विवाह सोहळ्याची

नीलेश दिवटे
Thursday, 14 May 2020

वेळ ठरली, वार ठरला मुहूर्त निघाला,सर्व खरेदी झाली पत्रिका ,निमंत्रण सगळे सोपस्कार पार पडले. मात्र कोरोनाचे संकट आले आणि लॉकडाऊन सुरू झाले.काही क्षणात पाहिलेली मयूरपंखी स्वप्न हवेत विरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

कर्जत: तोंडाला मास्क, प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळलेले अशा स्थितीत कर्जत तालुक्यात एक लग्न सोहळा पार पडला. लॉकडाउनमुळे नवीनच लग्न संस्कृती उदयास आली आहे.

या लग्नात संपूर्ण गावकऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. घरातील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गर्दी न करता घरातून अक्षता टाकल्या. ग्रामीण भागात सर्व शासकीय नियम पाळीत पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या विवाहाची सर्वत्र चर्चा होती.

तालुक्यातील गोयकरवाडा येथील सोनबा गोयकर यांचा मुलगा प्रवीण याचे शुभमंगल गावातीलच शिवाजी पांडुळे यांची सुकन्या सोनालिका हिच्याशी निश्चित झाले.

हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे यांची नगरमध्ये गुंतवणूक

वेळ ठरली, वार ठरला मुहूर्त निघाला,सर्व खरेदी झाली पत्रिका ,निमंत्रण सगळे सोपस्कार पार पडले. मात्र कोरोनाचे संकट आले आणि लॉकडाऊन सुरू झाले.काही क्षणात पाहिलेली मयूरपंखी स्वप्न हवेत विरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. या वेळी डॉ. मधुकर काळदाते आणि जेष्ठ नेते  बापूसाहेब काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच भाऊसाहेब वाघमोडे ,आरोग्यधिकारी चरण राऊत,सतीश माने,शंकर पांडुळे, बाळासाहेब माने ,नितीन पांडुळे,सौरभ कोळेकर आणि संभाजी गोयकर या सर्वांनी एकत्र येत सर्व शासकीय नियम पाळीत हा विवाह संपन्न करायचे ठरले. अखेर आज दुपारी सोशल डिस्टिंग ठेवीत,काही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.

रमेश मंत्री यांनी या सोहळ्याचे पौराहित्य केले.या सोहळ्यात मंडपाच्या गेटवर हात धुण्यासाठी पाणी व हॅन्ड वॉश तसेच एक जण हातावर सॅनिटायझर लावण्यासाठी व मास्क देण्यासाठी उभा होता.तसेच गावातील प्रत्येकाला अंगणवाडी सेविकेकडे  बापूसाहेब काळदाते यांचे हस्ते वधू वरांच्या उपस्थितित सर्व साहित्य देण्यात आले .या मुळे लग्न सोहळ्यातील अनिष्ट गोष्टींना लगाम बसण्या बरोबर अवांतर खर्च ही वाचला.

डिस्टन्स ठेवून लग्नसोहळा

सर्व तयारी झाली होती. मात्र कोरोनाचे लॉकडाऊन सुरू झाले आणि सर्वांचाच हिरमोड झाला.या वर सर्व शासकीय नियमांची अंमलबजावणी करीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टिंग ठेवीत  हा विवाह पार पडला आहे.

-बापूसाहेब काळदाते,सचिव, स्वानंद शिक्षण संस्था,चिंचोली काळदाते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of a wedding in Lockdown