उद्योजक हिरण हत्याप्रकरणातील आरोपींकडे सापडले सबळ पुरावे

Strong evidence found in accused in businessman deer killing case
Strong evidence found in accused in businessman deer killing case

श्रीरामपूर ः व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरणासह हत्याप्रकरणाची माहिती घेवून घटस्थळी आज भेट दिली. त्यानंतर मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पहाणी करुन साक्षीदारांची विचारणा केली आहे. मृताच्या मोबाईल फोन प्रवासाचा आढावा घेतला आहे.

साक्षीदारांच्या माहितीनुसार दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपास करुन विज्ञान दृष्टीकोणासह परिस्थितीचा आढावा घेवून संशयित आरोपी सागर गंगावणे आणि बिट्टु उर्फ रावजी वायकर यांना अटक केली. दोघांवरही यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यासाठी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डाॅ. प्रतापराव दिघावकर यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात पोलीस महानिरिक्षक डाॅ. दिघावकर आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील आज दुपारी पत्रकारांशी बोलत होते.

बेलापूर येथील व्यापारी हिरण हत्याप्रकरणात पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासह पोलीस महानिरिक्षक डाॅ. दिघावकर यांनी विशेष लक्ष घातले आहे. डाॅ. दिघावकर आज सकाळी श्रीरामपूरात आले. त्यांनी प्रारंभी बेलापूरात जावून व्यापारी हिरण यांचे अपहरण झालेल्या ठिकाणाची पहाणी केली. त्यानंतर मृतदेह आढळलेल्या ठिकाणी वाकडी शिवारात जावून पहाणी करीत माहिती घेतली. तेथून तातडीने शहर पोलीस ठाण्यात येवून संबंधित आरोपीकडे गुन्ह्याची विचारणा केली.

यावेळी पोलीस महानिरिक्षक डाॅ. दिघावकर यांच्यासोबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांचा पोलीस फौजफाटा शहर पोलीस ठाण्यात होता.

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, व्यापारी हिरण यांच्या हत्या प्रकरणाच्या परिस्थिती आणि शास्रीय पुराव्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांची माहिती राज्याच्या गृह विभागाला कळविण्यात आली आहे. हिरण यांचे अपहरण करणारा आणि त्याचा मृतदेह आणून टाकणाऱ्या वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरू आहेत. गंगावणे आणि वायकर याच्यावर यापुर्वी काही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. साक्षीदारांच्या माहितीनुसार त्यांना अटक केली. हिरण हत्या प्रकरणात पोलिसांनी विशेष लक्ष घातले आहे. पुढील तपास करुन गुन्हा उघड करणार असल्याचे डाॅ. दिघावकर यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com