esakal | घंटा वाजली! विद्यार्थी अजूनही शाळेची पायरी चढताना दिसेनात
sakal

बोलून बातमी शोधा

Students do not come to school

घंटा वाजली, शाळा सामाजिक अंतर, मास्क सर्व काही तयार मात्र पालक काही जबाबदारी घेत नाहीत.

घंटा वाजली! विद्यार्थी अजूनही शाळेची पायरी चढताना दिसेनात

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : घंटा वाजली, शाळा सामाजिक अंतर, मास्क सर्व काही तयार मात्र पालक काही जबाबदारी घेत नाहीत. शिक्षण संस्थाचालक पुढे सरकत नाहीत तर शिक्षक संभ्रम अवस्थेत असल्याने विद्यार्थी अजूनही शाळेची पायरी चढताना दिसेना त्यामुळे शाळेचे क्रीडांगण, वर्ग, प्यासेज मोकळे व रिते दिसत आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनावर जबाबदारी टाकून मोकळे तर तालुका प्रशासन मुख्याध्यापक व पालकांचे संमतीपत्र घ्या व स्थानिक स्कूल कमिटीला विचारून शाळा तुमच्या जबाबदारीवर सुरू करा, असा तोंडी आदेश देऊन आपली जबाबदारी पार करताना दिसत आहे.

तर पालकांनी तुमची जबाबदारी काय याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मुले शाळेत पाठविण्यात येणार नाहीत. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भात घेतलेल्या सरकारी निर्णयाविरोधात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने शाळा सुन्या- सुन्या दिसू लागल्या आहेत. 

सरकारने तातडीने निर्णय बदलला नाही तर शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तर उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अनुदान २० टक्के मंजूर होऊनही अद्याप याबाबत ठोस निर्णय न घेतल्याने शिक्षक उपाशीपोटी काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त करत शाळेकडे पाठ फिरवली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर