ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा झाला "गेम' 

Students' 'game' due to online learning
Students' 'game' due to online learning

नगर : कोरोना विषाणूमुळे शाळा व महाविद्यालय सुरू होण्यास विलंब असल्यामुळे काही शाळांनी ऑनलाइनच्या माध्यमातून अध्यापन सुरू केले आहे. तसेच खासगी शिकविण्याही याच पद्धतीने घेतल्या जात आहेत. यासाठी आई-वडिलांच्या मोबाईलचा वापर पाल्यांकडून केला जात आहे. मात्र, अभ्यासाच्या नावाखाली आता पाल्यांकडून मोबाईलवर गेम खेळण्यासह इतर उद्योग सुरू झाल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यातच शाळा सुरू होण्याचा अद्याप प्रशासनाकडून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वर्ग घेण्यास सुरवात केलेली आहे. यामध्ये आता सर्वच वर्गांचा समावेश झालेला आहे.

पहिल्या टप्प्यात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिकवण्या शाळा व खासगी क्‍लासचालकांनी घेतल्या आहेत. नेटवर्कचा प्रतिसाद मिळत नसला, तरी विद्यार्थी त्यात सहभागी होत आहेत. या ऑनलाइन वर्गामुळे मुलांच्या हातात मोबाईल पडत असल्याने त्यांच्याकडून आता अभ्यासाऐवजी मोबाईलवर गेम खेळण्याबरोबरच टिकटॉकवर व्हिडिओ करण्यावरच अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

मोबाईल नाही दिला, तर मुलाचे शैक्षणिक नुकसान होते; दिला तर त्यांच्याकडून गेम व इतर उद्योग केले जातात. मोबाईल दिल्यानंतर ते अभ्यास करतात की काय हे सारखे पाहणे पालकांना शक्‍य होत नसल्यानेच हा प्रकार आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. 

पाल्यांच्या "उद्योगा'ने पालकांना मनःस्ताप 
कोरोनामुळे दहावी व बारावीच्या शाळांच्या व खासगी शिकवण्या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात असून, त्यासाठी आई-वडिलांकडून मोबाईलचा वापर केला जात आहे. या अभ्यासादरम्यान जर एखाद्या आप्तेष्टाकडून आलेल्या संदेशाचा अभ्यासात अडसर ठरला, तर संदेश डिलिट करून तो नंबरच ब्लॉक करण्याचा "उद्योग' सुरू झालेला आहे. त्यामुळे महत्त्वाचे मेसेज मिळण्यात अडचणी येत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com