
-समीरण बा. नागवडे
श्रीगोंदे: तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५ प्राथमिक शाळांमधील तब्बल ५४ वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. परिणामी, ३९ वर्ग कुठे मंदिरात, झाडाखाली, शाळेच्या पडवीत तर कुठे अगदी गोडाऊनमध्येही भरविले जात असल्याचे आकडेवारी सांगते. या ३९ वर्गांसाठी ३५ वर्ग खोल्यांची गरज असून तसे प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेकडे पाठविले आहेत.