गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जिल्हा परिषद शाळांनी कात टाकली

राजू घुगरे
Saturday, 26 December 2020

गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जिल्हा परिषद शाळांनी कात टाकली असून खाजगी शाळेच्या तुलनेत पालकांच्या पसंतीस उतरल्या आहेत, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांनी केले.

अमरापूर (अहमदनगर) : गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जिल्हा परिषद शाळांनी कात टाकली असून खाजगी शाळेच्या तुलनेत पालकांच्या पसंतीस उतरल्या आहेत, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांनी केले. अमरापूर येथे आयोजित शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी कराड बोलत होते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी सरपंच संगिता पोटफोडे, उपसरपंच शारदा बोरूडे, केंद्रप्रमुख युसुफ शेख,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप बोरूडे, उपाध्यक्ष संदिप खैरे,मुख्याध्यापक बप्पासाहेब मरकड आदी प्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विदया परिषदेच्या मार्फत फेब्रु2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे 16 विद्यार्थी पात्र झाले.

भारती दत्तात्रय आठरे या विदयार्थीनीने 300 पैकी 218 गुण मिळवून जिल्हयाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून तिची जिल्हा शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.तर जेबा सुभान शेख,मोहम्मद सिकंदर शेख या विदयार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.परिक्षेच्या तयारीसाठी वर्गशिक्षक सतिष धनवडे, राजेंद्र खंडागळे ,वैशाली शेळके, राजेंद्र पाचे, गितांजली आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व शिक्षकांचाही पालक व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students who passed the scholarship examination were felicitated at Amarpur