श्रीरामपूरच्या परिवहन अधिकाऱ्याच्या अंगावर ऑइल; अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन

परिवहन अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन
Sub-Regional Transport Officer of Shrirampur threw oil on his body agitation of transport officials  ahmednagar
Sub-Regional Transport Officer of Shrirampur threw oil on his body agitation of transport officials ahmednagarsakal

श्रीरामपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली नाही असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालायला टाळे ठोकून अधिकारी नानासाहेब बच्छाव यांच्या अंगावर ऑइल सदृश पदार्थ टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.आज (ता. १८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालायला समोर ठिय्या मांडला. त्यानंतर कार्यालयाचे मुख्य गेट बंद केले व घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीने बच्छाव यांना फोन करून याठिकाणी बोलावून घेतले. ते आल्यानंतर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी का साजरी केली नाही याचा जाब विचारला.

तसेच त्यांना पुष्पहार घातला. त्यानंतर एका कार्यकर्त्याने त्यांच्या अंगावर ऑइल सदृश पदार्थ टाकला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बच्छाव गोंधळून गेले. त्यांनी येथून काढता पाय घेत निघून गेले. यानंतर परिवहन अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारात सर्व शहर पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. प्रथम अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची भेट घेतली. बच्छाव हे शहर पोलीस ठाण्यात आले. त्यांच्या समवेत मोटर वाहन निरीक्षक विनोद घनवट, सुनील गोसावी, जयश्री बागुल, विकास सूर्यवंशी, पद्माकर पाटील, धर्मराज पाटील, उपनिरीक्षक श्वेता कुलकर्णी, अनिल गावडे, मयुरी पंचमुख, सुजाता बाळसराफ व कर्मचारी उपस्थित होते.

या घटनेचा चालक मालक प्रतिनिधी संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. बच्छाव यांच्या आठ महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आज घडलेल्या घटनेमागे वर्गणी तसेच मार्चएंडच्या नावाखाली सुरू असलेली मोठयाप्रमाणातील दंडाची कारवाईची किनार असल्याची यावेळी चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com