

Nation Salutes as Subedar Baban Shinde Cremated with Official Honours
sakal
करंजी : दगडवाडी (ता. पाथर्डी) येथील सैन्यदलात भरती झालेल्या बबन दत्तात्रय शिंदे (वय ४६) यांचे अमृतसर (पंजाब) येथे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचा पार्थिव देहवर बुधवारी सकाळी दगडवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.