esakal | पोलिस उपनिरीक्षक राणा परदेशीला न्यायालयीन कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

SubInspector of Police Rana Pardeshi in judicial custody

चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी सोनाराला अटक न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी व विशाल पावसे या खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ३) दुपारी रंगेहात पकडले होते.

पोलिस उपनिरीक्षक राणा परदेशीला न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी सोनाराला अटक न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी व विशाल पावसे या खासगी व्यक्तीला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ३) दुपारी रंगेहात पकडले होते. या दोघांनाही संगमनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

या प्रकरणाच्या अधीक तपासासाठी तसेच त्यांच्या आवाजाचे नमूने तपासण्यासह या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेण्यासाठी या दोघांनाही तीन दिवसांची एसीबी कोठडी देण्याची मागणी एसीबीच्यावतीने करण्यात आली होती. याशिवाय संबंधिताला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जावू शकतो असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील अतुल आंधळे यांनी खोडून काढल्याने न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या नंतर त्यांनी जामिनाचा अर्ज केल्याने, प्रत्येकी एक जामिनदार घेवून त्यांना जामिन मंजूर करण्यात आला.

संपादन : अशोक मुरुमकर