esakal | Success story : केळी लावण्यासाठी पट्ट्याने विकली शेती; सध्या महिन्याला पाठवतायेत २० कंटेनेर परदेशात
sakal

बोलून बातमी शोधा

The success story of Kiran Doke in Solapur district

जिद्द आणि चिकाटी असेल तर खरचं कोणतीच गोष्ट या जगात अशक्य नसते. याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत.

Success story : केळी लावण्यासाठी पट्ट्याने विकली शेती; सध्या महिन्याला पाठवतायेत २० कंटेनेर परदेशात

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : जिद्द आणि चिकाटी असेल तर खरचं कोणतीच गोष्ट या जगात अशक्य नसते. याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. त्यापैकी एकजण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील किरण डोके!

मनात ठरवलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी जमीन विकुन भांडवल उभा केले. आज त्यांच्या प्रकल्पातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून महिन्याला ते २० कंटेनेर परदेशत पाटवत आहेत. यातून अनेक बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. त्यांचे शिक्षणही फक्त १२ वी झाले आहे. 

किरण डोके हे करमाळा तालुक्यातील कंदर येथील आहेत. त्यांना कसलीही व्यवसायिक पार्श्वभूमी नाही. त्यांचे शेतकरी कुटुंब आहे. त्यांचा प्रक्लपाने (ब्रँड) परदेशाबरोबर देशांतर्गत केळी बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे. पारंपारिक पिकातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शेतात पाईपलाईन करण्यासाठी जमीन विकला. आणि शेतात केळी लागवड केली. यातून पुढे त्यांनी व्यवसाय वाढवत स्वत:च केळी निर्यात करण्यास सुरुवात केली. त्यांनी केळीवर प्रक्रिया उद्योग उभारणारला. त्यातून वर्षाला सुमारे दोनशे कंटेनरची निर्यात ते आखाती देशात करत आहेत.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
करमाळा तालुक्यात उजनी धरणाच्या बॅकवॉटर भागात ऊसाचे क्षेत्र मोठ्याप्रमाणत घेतले जात. मात्र, ऊसाचे राजकारण सुरु झाले आणि शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली. यातूनच या भागातील शेतकरी केळीकडे वळाले. यातूनच डोके यांनी केळी करण्याचा निर्णय घेतला. पण भांडवलाची अडचण होती. डोक्यावर कर्जाचा बोजाही वाढत होता. त्यामुळे हतबल झालेल्या डोके यांनी ४० पैकी सहा एकर शेती विकली. आणि सर्वांची देणी देऊन शेतात पाईपलाईन खोदली. त्यांनी केळीचे पीक घेतले. त्यानंतर त्यांनी ती केळी स्वत:च विकण्याचाही निर्णय घेतला. 


त्यांचे प्राथमिक शिक्षण कंदर येथील शाळेत पूर्ण झाले. पुढील शिक्षण टेंभुर्णी येथे झाले. बारावीनंतर ते शेतीकडे वळाले. पुढे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत. घरातील आई- वडील भाऊ सर्वजण शेती करत होते. त्यामुळे त्यांनीही शेती करण्यास सुरुवात केली. मात्र, यातून जास्त उत्पन्न निघत नव्हते. केळीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. मात्र, केळीची विक्री करताना दलालाकडून पिळवणूक होऊ लागली. त्यामुळे त्यांनी केळीच्या बाजारपेठेवर अभ्यास करण्यास सुरुवात केली. स्वत: केळी विकल्यानंतर त्यांना चांगला दर मिळाला. त्यांनी संबंधित कंपनीसाठी शेतकऱ्यांशी संपर्क साधून केळी पाठविण्यास सुरुवात केली. 

शेतकऱ्यांनाही इतरांपेक्षा चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी सहाजिकच तिकडे वळाले. त्यातून खरेदीदार कंपन्या, व्यापारी व शेतकरी यांचे विश्वासाचे नाते निर्माण झाले. बाजारपेठेतील दर कमी झाल्यानंतर नाशवंत असणाऱ्या केळीसाठी गरज ओळखून त्यांनी आधुनिक शीतगृह तयार केले. यामुळे बाजारपेठेतील तेजी- मंदीचा फायदा मिळाला.

पुणे, मुंबई व दिल्ली बाजारपेठेत त्यांनी केळी पाठवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी परदेशातही केळी निर्यात करण्यास सुरुवात केली.

आठवड्यातून 4 ते 5 कंटेनर केळी ते परदेशात निर्यात करतात. केळीचा दर्जा पाहून संबंधित मागणी असणाऱ्या बाजारपेठेकडे त्यावर प्रतिक्रया करुन पाठवतात.  त्यांनी व्यवसायातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

loading image