कुकाणे : अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा १६ साखर कारखान्यांचे यंदाचा गळीत हंगाम ऊस टंचाईच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी मार्चअखेर संपणार आहे. यामुळे यंदाच्या हंगामाची कारखान्यांची धुराडी २० ते २५ दिवसांत बंद होत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के साखरेचे उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. सर्वच कारखान्यांनी ठेवलेले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. याचा आर्थिक फटका कारखाना व्यवस्थापनांना बसणार आहे.