esakal | ऊसतोडणी कामगारांनी उभारली कष्टाची गुढी
sakal

बोलून बातमी शोधा

Sugarcane harvesters celebrate Gudipadva festival.jpg

आज अनेक ऊसतोडणी कामगारांनी सणाची सुट्टी घेत गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला.

ऊसतोडणी कामगारांनी उभारली कष्टाची गुढी

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : ऊन, वारा, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीचा कुठलाही विचार न करता पत्करलेलं कष्ट करत आलो. या कष्टातही आनंद मानून ऊसतोडणी कामगारांनी मोठ्या आनंदात गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. 

आज सकाळी मुळा कारखाना गट परिसरात भेट दिली असता ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या भागात मोठा आनंदाचा सोहळा पाहण्यास मिळाला. आपआपल्या पाचराटाच्या झोपडीसमोर महिला व लहान मुली सडारांगोळी करताना दिसल्या. चिमुकले घराच्या परिसरात स्वच्छता करत होते. लहान मोठ्यांची सुरु असलेली लगबग कौतुकास्पद होती.

रोज पहाटे ऊसतोडणीसाठी दहा ते पंधरा किमी जावे लागते. ऊसाने भरलेली बैलगाडी घेवून कारखान्याकडे येताना हा सारा प्रवास कडक उन्हात होतो. कष्ट आणि उन्हातील प्रवासामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग अजून तरी झालेला नाही, असे नागेश गर्जे यांनी सांगितले. कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी कामगार महत्वाचा दुवा असल्याने मुळा कारखान्याच्या वतीने सर्वांची विशेष काळजी घेतली जाते. 

आज अनेक ऊसतोडणी कामगारांनी सणाची सुट्टी घेत गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला. घरी गोडधोड जेवण करुन मराठी नववर्षानिमित थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद घेतले. गळीत हंगामनिमित्त सहा ते सात महिने राबणारे आमचे हात घरी गेल्यानंतरही थांबत नाही. घरच्या शेतात कष्टाचा दुसरा भाग सुरु होतो, असे दिनकर राठोड यांनी सांगितले. 

loading image