
अहिल्यानगर : जिल्ह्यात यंदा ऊसदराची कोंडी फुटण्यास तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला. प्रवरानगरचा पद्मश्री विखे सहकारी साखर कारखाना वगळता इतरांनी पहिला हप्ता तीन हजारांच्या आत जाहीर केला. एकंदरीत सहकाराच्या पंढरीत ऊसउत्पादकांची परवड होताना दिसते आहे.