Leopard rampage : सुगाव बुद्रुकमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ; १२ शेळ्या, पाच कोंबड्यांचा पाडला फडशा
Akole News : रात्री तीन वाजेच्या बिबट्याने शेडमध्ये घुसून शेळ्या व कोंबड्यांवर हल्ला करून फस्त केल्या. सकाळी जगदाळे कुटुंबीयांनी ही घटना सकाळी दिसून आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
अकोले : तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील रवींद्र जगदाळे यांच्या मालकीच्या गोठ्यात घुसून बिबट्याने १२ शेळ्यांचा आणि पाच कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे जगदाळे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे.