

Akole Bank Election Sujay Vikhe Urges Political Leaders to Set Aside Differences and Unite for Farmers and Cooperative Bank Members
sakal
अकोले : शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एका होडीत बसणे आवश्यक आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अकोले तालुक्यातून सर्वाधिक अर्ज दाखल झाले असून, याबाबत ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. बोट वल्हविण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवा; कोणतेही भांडण न होता सर्वांचा प्रवास सुखाचा होईल आणि शेतकरी व बँकेच्या सभासदांचे हित साधले जाईल, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.