
सोनई : कुटुंबातील कर्ती स्री स्वतःचे अस्तित्व पणाला लावून कौटुंबिक सौख्य जपते. प्रत्येक नात्यात व प्रेमात कुठे तरी स्वार्थाची झालर दिसत असली, तरी फक्त आणि फक्त आईच्या प्रेमात कुठलाच स्वार्थ नसल्याने हे नाते जगात सर्वश्रेष्ठ आहे. फक्त जागतिक महिला दिन नव्हे, तर वर्षातील ३६५ दिवस महिला सन्मानासाठी पात्र आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी व्यक्त केले.