
संगमनेर ः उभय कुटुंबाच्या संमतीने साखरपुडा होवून दागिन्यांसह पैशांची देवाण घेवाणही झाली. मात्र, अवघ्या चार महिन्यांत विवाहापूर्वीच तिच्यावर धक्कादायक आरोप लावण्यात आले. त्यामुळे ती हबकून गेली. त्या वागदत्त वधूला सगळं नीरस वाटायला लागलं. त्यातून तिने टोकाचे पाऊल उचललं.
या घटनेचा तपास करताना, पुढे आलेली माहिती अशी, भारतीचा विवाह दोन्ही कुटूंबांच्या संमतीने ठरला होता. 30 जून रोजी त्यांचा हंगेवाडी येथे साखरपुडा झाला होता.
आरोपीला एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी व दोन लाख रुपये दिले होते. वर पक्षाने तिला दोन तोळे वजनाचे नेकलेस व कानातील दागिने दिले होते. यानंतर 15 जुलैपासून कालपर्यंत आरोपीने भारती व तिचा भाऊ किरण यांच्याशी गोडीगुलाबीने वागून साखरपुड्यातील दागिने व्यवस्थित करुन आणून देतो असे सांगून परत नेले.
रविवारी ( ता. 01 ) नोव्हेंबर रोजी वागदत्त वधू भारती व तिचा भाऊ किरण अपशकुनी असल्याचे सांगत वरपक्षाने ठरलेला विवाह मोडला. सांगळे कुटूंबियांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच त्यांच्याकडून घेतलेले पैसे व दागिने परत देण्यास नकार दिला.
या घटनेमुळे भारती व्यथित झाली होती. यातून तिने टोकाची भुमिका घेत जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी किरण भास्कर सांगळे ( वय 32 ) रा. हंगेवाडी याने आश्वी पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून, वरपक्षाकडील चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण मदने, पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नयन पाटील पुढील तपास करीत आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.