राष्ट्रवादीत प्रवेश करुन भाजपच्या नगरसेवकांचे आमदार रोहित पवार यांना सरप्राईज

निलेश दिवटे
Wednesday, 30 September 2020

आमदार रोहित पवार यांना भाजपा नगरसेवकांनी वाढदिवसानिमित्त सरप्राईज दिले. बापूसाहेब नेटके व मनीषा सोनमाळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

कर्जत (अहमदनगर) : आमदार रोहित पवार यांना भाजपा नगरसेवकांनी वाढदिवसानिमित्त सरप्राईज दिले. बापूसाहेब नेटके व मनीषा सोनमाळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी आणि त्यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सोनमाळी यांचेसह डॉ. प्रकाश भंडारी, सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर व राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी उद्योजक दादासाहेब थोरात, सुनील शेलार आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surprise to BJP corporator MLA Rohit Pawar by NCP entry