esakal | आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Suspect arrested for molesting tribal woman

आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या 34 वर्षाच्या आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन, आश्वी पोलिस ठाण्यात विनयभंग व अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला .

आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या 34 वर्षाच्या आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन, आश्वी पोलिस ठाण्यात विनयभंग व अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी गोकुळ ढमक (रा. चणेगाव, ता. संगमनेर) या युवकाला अटक करण्यात आली आहे. 

याबाबत आश्वी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवार ( ता. 13 ) रोजी पिडीत महिला एका शेतात शेळ्या चारण्यासठी गेली होती. तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या आरोपीने पैशाचे आमिष दाखवून तिचा हात धरुन ओढला. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची फिर्याद पिडीतेने पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार या आरोपीविरुध्द विनयभंग व अनसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने करीत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image