मुलीचा मृत्यू ः आई-बाप म्हणतात साप चावला.. डॉक्टरांना वेगळाच संशय

Suspicious death of a girl in Nevasa
Suspicious death of a girl in Nevasa

नेवासे : तालुक्यातील सौंदळे येथे एका नऊ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आई-वडील म्हणतात आमच्या मुलीचा मृत्यू सर्पदंशाने झाला. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांने मृत्यूचे दुसरेच गंभीर कारण असल्याचे सांगून मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तापासणीसाठी पाठवला. 

पोलिसांना चौकशी वरून अत्याचाराचा संशय आणि ग्रामस्थांत अत्याचार व घातपाताची चर्चा आहे. यामुळे या मुलीच्या मृत्यूचे गूढ वाढतच चालले आहे. आतासर्वांचे लक्ष जिल्हा रुग्णालयाच्या उत्तर तपासणीकडे लागले आहे.

डॉक्टरांना वेगळाच संशय

या बाबत माहिती अशी, नेवासे तालुक्यातील सौंदाळे येथे एक नऊ वर्षीय मुलीचा शनिवारी ते रविवारी रात्री मृत्यू झाला. दरम्यान तिच्या आई-वडिलांनी तिचा मृतदेह नेवासे फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केला. मुलीचा सर्पदंशने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांना सांगितले. मात्र, डॉक्टरांना प्राथमिक तपासणी केल्यावर संशय आल्याने त्यांनी मृतदेह तपासणीसाठी नेवासे फाटा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने मृदेहाची तपासणी केली. मुलीचा मृत्यू सर्पदंशाने झाला नसल्याचे पोलिसांना कळवले. 

पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस कॉन्स्टेबल आंबादास गीते हे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेचे गांभीर्य सांगून मृतदेह नगर येथे जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तापासणीसाठी दाखल करण्याचे सांगितले.

भाचा घेतला ताब्यात

पोलिसांनी मयत मुलीच्या आई-वडिलांसह त्यांचा गावातीलच भाचा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कसून चौकशी करत आहेत. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सौंदळे येथे जाऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अहवालानंतरच सत्य उजेडात 
पोलीस चौकशीत मयत मुलीच्या कुटूंब सदस्यांत विसंगती आढळून आल्याने पोलीसांचा संशय वाढला आहे. मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तापासणीसाठी पाठवला अाहे. तो अहवाल आल्यावरच सत्य उजाडत होईल. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे हे अधिकारी कुकाणे पोलीस दुरक्षेत्रात सायंकाळपर्यंत ठाण मांडून होते.

अत्याचार किंवा घातपातच? 

मयत मुलीचे आई-वडील मुलीचा मृत्यू हा सर्पदंशानेच झाल्यावर ठाम आहेत. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीवरून व पोलिसांच्या चौकशीतून सर्पदंशाच्या ठिकाणी तीन जखमा होतात. तसेच पायांना व इतर ठिकाणी सूज व जखमा झाल्या आहेत. तसेच चौकशीत मोठी विसंगती आहे. यावरून या मुलीचा मृत्यू अत्याचार किंवा घातपात असल्याचाच संशय व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com