Milk: दुधाळ जनावरांचे आता टॅगिंग ; दूधसंकलनाच्या माहितीसह भेसळ रोखण्यास होणार मदत

या टॅगिंग मोहिमेमुळे राज्यभरातील दूध संकलनाचा एकूण डाटा राज्य सरकारला जमा करता येईल. आज त्याबाबतची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे अनुदान देण्याची वेळ आली की अडचणी निर्माण होतात.
sambhaji nagar cow
sambhaji nagar cowSakal

दुभत्या जनावरांचे टॅगिंग आणि अॅपच्या सहाय्याने दूधसंकलनाचा डाटा तयार करण्याची मोहीम दुग्ध व्यवसाय विकास आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हाती घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष दुभत्या जनावरांची संख्या आणि प्रत्यक्ष दूधसंकलन यातील तफावत शोधण्याचा प्रयत्न त्यातून केला जाईल.

या मोहिमेद्वारे राज्यातील दुभत्या जनावरांचे सरासरी दुग्धोत्पादन वाढविण्यासाठीच्या कार्यक्रमाचे नियोजन करणे सुलभ होईल. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या प्रक्रियेत देखील हा मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. दूध स्वीकृतीच्या निकषात बदल करून भेसळ रोखण्याचा आणखी प्रयत्न केला जाणार आहे. दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या मोहिमेचे सूतोवाच केले होते. काल त्यावर शिक्कामोर्तब झाले.

sambhaji nagar cow
Jaggery Milk : या कारणांमुळे हिवाळ्यात प्यावे गुळाचे दूध, आरोग्याच्या समस्या होतील दूर

दुभत्या जनावरांचे टॅगिंग केले जाईल. त्यासोबतच्या अॅपवर शेतकऱ्यांनी त्यात जनावराचा वाण, वय, दैनंदिन व एकूण दूध उत्पादनाची माहिती भरायची आहे. ही माहिती दूध संकलन केंद्रांत संकलित केली जाईल. तेथून ती खासगी व सहकारी संघाकडे जाईल.

ही माहिती आणि प्रत्यक्षातले संकलन यात तफावत आढळली, तर भेसळ शोधणे किंवा अनुदान लाटण्यासाठी अधिकचे दूध दाखविता येणे अवघड होईल, असा कयास आहे. या टॅगिंग मोहिमेमुळे राज्यभरातील दूध संकलनाचा एकूण डाटा राज्य सरकारला जमा करता येईल. आज त्याबाबतची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे अनुदान देण्याची वेळ आली की अडचणी निर्माण होतात.

sambhaji nagar cow
Milk Subsidy: दुध उत्पादकांना 5 रुपये अनुदानाचा लाभ फक्त महिन्याभरासाठीच! 'या' कालावधीपर्यंत असणार योजना

राज्यभरातील पशुधनाचे टॅगिंग हा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. राज्यात खरेच किती दूध निर्माण होते, याचा प्राथमिक अंदाज त्यातून येईल. आजवर याबाबतही नेमकी माहिती संकलित करण्यात आली नव्हती, तसेच दुधाळ जातींच्या गायींच्या पैदाशीवर भर देण्याच्या कार्यक्रमासाठी देखील त्याचा मोठा आधार होईल. त्यावरून या मोहिमेची दिशा ठरवता येईल.

- राधाकृष्ण विखे पाटील, दुग्धव्यवसाय विकासमंत्री

sambhaji nagar cow
Cow Milk : गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान - राधाकृष्ण विखे पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com