
नगर तालुका : तांत्रिक कारणामुळे मागील अनेक दिवसांपासून संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळत नव्हते. अहिल्यानगरचे तहसीलदार संजय शिंदे यांनी तत्परता दाखवत अवघ्या काही वेळातच तालुक्यातील कामरगावच्या लाभार्थ्यांच्या अडचणी सोडून अनुदानाचा मार्ग मोकळा केल्यामुळे सर्व लाभार्थी गहिवरून गेले होते.