पारनेर - जमिनीच्या खरेदीखताची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजारांची लाच मागून तडजोडी अंती आठ हजार रुपये पंचासमक्ष स्विकारताना वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील ग्राम महसूल अधिकारी (कामगार तलाठी) दिपक भिमाजी साठे (वय-३६, रा. हंगा, ता. पारनेर) यास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले . त्याच्या विरोधात सुपे पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.