"या' तालुक्यात 59 टँकर भागवतात एक लाख लाेकांची तहान

In this taluka 59 tankers carry one lakh citizens  Thirst
In this taluka 59 tankers carry one lakh citizens Thirst
Updated on

नगर ः सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना गावशिवारात टंचाई सावट जाणवू लागले. जिल्ह्यातील 51 गावे, 213 वाड्या-वस्त्यांवरील एक लाख दहा हजार 697 नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या 59 टॅंकरची धावाधाव सुरू आहे. 

गेल्या वर्षी पावसाने कहर केला. टॅंकरच्या आकड्याने गेल्या अठरा वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक करीत उच्चांकी आकडा गाठला होता. मागील वर्षी जिल्ह्यातील 572 गावे व तीन हजार 200 वाड्या-वस्त्यांवरील 13 लाख 49 हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे 827 टॅंकर धावत होते. यंदाच्या उन्हाळ्यात पाणी परिस्थिती चांगली राहिल्याने टॅंकरची मागणी उशिरा आली.

यंदा एप्रिल महिन्याच्या सुरवातीला जिल्ह्यातील पठार भागातून टॅंकरचे प्रस्ताव येण्यास सुरवात झाली. सुरवातीला टॅंकरमंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्यस्तता लक्षात घेऊन सरकारने टॅंकरमंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांकडे दिले. आजअखेर जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

तालुकानिहाय टॅंकर 
संगमनेर-8 
नेवासे-1 
नगर-10 
पारनेर-11 
पाथर्डी-2 
कर्जत-5 
जामखेड-18 
श्रीगोंदे-4 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com