

Delhi Honours Tamasha Art: Padma Shri Announced for Raghunath Khedkar
Sakal
-राजू नरवडे
संगमनेर: तमाशा ही केवळ कला नाही, तर पिढ्यान्पिढ्या जपलेली लोकपरंपरा आहे. या परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिले, अशा संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ जाहीर झाला. प्रथमच तमाशा कला क्षेत्राला हा राष्ट्रीय सन्मान मिळतोय. तो केवळ एका कलाकाराचा नसून संपूर्ण लोककलेचा गौरव आहे.