
राहुरी : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अरुण बाबुराव तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राहुरी फॅक्टरी येथे तनपुरे कारखान्याच्या संलग्न संस्था श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.